Nandurbar : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारीसाठी नवयुवक व नवयुवतींसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी कळविले आहे
शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी 01 फेब्रुवारी 2024 ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) सत्र क्र. 62 चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10-30 वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावरील सत्र क्र. 62 साठी असलेले प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे पूर्ण भरुन सोबत आणावी. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेसाठी आनलाईन अर्ज केलेला असावा.
याबाबत अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल पत्ता [email protected] व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाटसअॅप क्र. 9156073306 अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.