Nandurbar Crime : ‘त्या’ खुनाचा उलघडा; पुर्व वैमनस्यातून केला तरुणाचा खून !

नंदुरबार  : शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ २० रोजी एका २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी उलघडा केल्या असून पुर्व वैमनस्यातून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी , जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील असे आरोपींचे नाव आहे.

 

नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ लेआऊटचे काम सुरु असलेल्या ठिकाणी महेंद्र दिलीप भोई वय- २६ या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दि. २१ रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील नवनाथ नगर परिसरात राहणारा गौरव सोनवणे (चौधरी) याने व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने हा खून केला असून तो सद्या खांडबारा परिसरात पळून गेलेला आहे.

पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. पथकाने संशयीत गौरव सोनवणे (चौधरी) याचा खांडबारा येथे ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने गुहा केल्याचे कबूल केले. ते बाहेर राज्यात पळून गेल्याचे सांगितले. एक पथक गुजरात राज्यात रवाना झाले व गौरव सोनवणे याने दिलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही संशयीतांना सुरत येथे ताब्यात घेतले. त्यांचे नाव १) यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी (वय-१८) , २) जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील (वय-२० दोन्ही रा. नवनाथ नगर, नंदुरबार ) असे आहे. त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले. तसेच गुन्हयातील त्यांचा एक साथीदार गौरव रोहिदास खेडकर (भोई) (वय-२० रा. जूनी भोई गल्ली, नंदुरबार) यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांनी सदरचा खून पुर्व वैमनस्यातून कट रचून केल्याचे सांगितले आहे.

हि कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोह/राकेश वसावे, पोना/राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोशि / विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे,यशोदिप ओगले तसेच शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोह/सुनिल येलवे, भटू धनगर , किरण मोरे यांनी केली.