Nandurbar Lok Sabha ! …तर नंदुरबारमध्ये अपक्ष उमेदवार विजयी ?

xr:d:DAFtd8oCXa8:2682,j:9205782454713672210,t:24041406

Nandurbar Lok sabha : नंदुरबार लोकसभेसाठी भाजपकडून डॉ.हिना गावित तर महाविकास आघाडीकडून आमदार ॲड.के. सी. पाडवी यांचे सुपुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपल्या पक्षाला कसा विजय मिळेल, यासाठी दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. असे असले तरी खरा मतदार मात्र “नेमकं मत कुणाला द्यायचं ?” यात संभ्रमात असल्याचं चित्र आहे. कारण बेरोजगारी, शिक्षक, आरोग्य आणि अन्य प्रश्न हे सत्ताधारी पक्षांकडून पाहिजे तसे सोडविले जात नाहीय. तर दुसरीकडे आमदार ॲड. के.सी. पाडवी यांनी सुमारे ३५ वर्षे अक्कलकुवा- धडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व व अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री पदावर असताना देखील विकासाचा विक्रम केला नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहेत. यामुळे मतदारांनी भाजप, काँग्रेसकडे दुर्लक्ष केल्यास याचा थेट फायदा (बिरसा फायटर्स अध्यक्ष सुशीलकुमार पावरा) अपक्ष उमेदवाराला होऊ शकतो, हे नाकारता येत नाही.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आता मोठी खिंडार पडली आहे. भाजपने हा गड भेदून काढत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेतेही भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत विधानसभेचे दोन आमदार वगळता वजनदार नेते कोणीही नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच आदी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवरच निवडणुकीची भिस्त आहे. एकीकडे एक दशकपूर्ण केलेले खासदार भाजपचे उमेदवार आहेत. तर राजकारणात नवखा मात्र उच्चशिक्षित तरूण उमेदवार काँग्रेसने दिला आहे. उमेदवारांना राजकीय वारसा आहे. मात्र सध्याच्या राजकारणात राजकीय गणित विस्कटले आहे.

मागील निवडणूकीत नंदुरबार लोकसभेत काँग्रेसने ॲड. के.सी. पाडवी यांना शिरपूरचे माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, नंदुरबारचे नेते चंद्रकांत रघुवंशी, तळोद्याचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी खासदार (कै) माणिकराव गावित, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, भरत गावित, विद्यमान आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच व कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यामुळे ॲड. पाडवी यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना अत्यंत जोरदार लढत दिली होती. मात्र यावेळचे चित्र पाहता काँग्रेसमधील काही मान्यवर नेत्यांनी पक्षांतर केले आहे. आमदार अमरिशभाई पटेल, तळोद्याचे माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प. माजी अध्यक्ष भरत गावित हे भाजपमध्ये गेले आहेत. तर माणिकराव गावित यांचे निधन झाले. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक वयोवृध्द झाल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत. तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हणजे खऱ्या अर्थान काँग्रेसचे वजनदार नेते इतर पक्षात गेले. त्यामुळे यंदाचा निवडणुकीत काँग्रेसकडे स्वतः माजी मंत्री तथा आमदार ॲड.के.सी. पाडवी, नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार सुर्यवंशी हे स्थानिक नेते वगळता केवळ जिल्हा परिषदेचे काही सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच व काही सामान्य कार्यकर्त्यांची ताकद शिल्लक राहिली आहे. त्यांचावरच कांग्रेस पक्षाची निवडणूकीची भिस्त आहे.

दुसरीकडे भाजपकडे वजनदार नेत्यांची मोठी फळी तयार झाली आहे. स्वतः उमेदवार डॉ. हिना गावित यांचे स्वतंत्र वलय आहे. त्यांचे वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार शरद गावित हे त्यांच्या कुटुंबातील राजकीय नेते आहेत. तर पक्षीय बळ म्हटल्यावर शिरपूरचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, धुळे जि.प.माजी अध्यक्ष तुषार रंधे, तळोद्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार राजेश पाडवी, शिवसेनेत (शिंदे गट) नुकतेच प्रवेश केलेले आमदार आमशा पाडवी, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तळोद्याने नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ. शशिकांत वाणी, नागेश पाडवी, जि.प. चे माजी अध्यक्ष भरत गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, साक्रीतून जि.प. चे माजी अध्यक्ष शिवाजी दहीते, अॅड. संभाजी पगारे हे बजनदार नेते आहेत. त्यांचासोबतच मित्र पक्ष म्हणून विचार केल्यास शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे आदीचे बळ सोबत आहे.

असे असले तरी खरा मतदार मात्र “नेमकं मत कुणाला द्यायचं ?” यात संभ्रमात असल्याचं चित्र आहे. कारण बेरोजगारी, शिक्षक, आरोग्य आणि अन्य प्रश्न हे सत्ताधारी पक्षांकडून पाहिजे तसे सोडविले जात नाहीय. तर दुसरीकडे आमदार ॲड. के.सी. पाडवी यांनी सुमारे ३५ वर्षे अक्कलकुवा- धडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व व अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री पदावर असताना देखील विकासाचा विक्रम केला नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहेत. यामुळे मतदारांनी भाजप, काँग्रेसकडे दुर्लक्ष केल्यास याचा थेट फायदा (बिरसा फायटर्स अध्यक्ष सुशीलकुमार पावरा) अपक्ष उमेदवाराला होऊ शकतो, हे नाकारता येत नाही.  तर मतदार थेट अपक्षालाच मतदान करेल असही सांगता येणार नाही. मात्र, ‘नेमक कुणाला विजयी करायचं’ हे मात्र मतदारच ठरवेल…