Nandurbar Lok Sabha Election Result : नंदूरबार लोकसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.
भाजपने डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने यावेळी राजकीय क्षेत्रात फारसे परिचीत नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.६८ टक्के मतदान झाले होते.
खासदार हिना गावित यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी राहिलेली नसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.