---Advertisement---

Nandurbar News : अखेर संतप्त ग्रामस्थांनी काढला भर पावसात मोर्चा

---Advertisement---

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या बिजरी गव्हाण येथील रेशन दुकानदार गेल्या सहा ते सात महिन्यापासून ग्रामस्थांना रेशनच देत नाही. याबाबत थेट जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पाठपुरावा केला मात्र, न्याय न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी भर पावसात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत रोष व्यक्त केला.

गेल्या सहा महिन्यात गावात फक्त एकदाच रेशन वाटप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रेशन दुकानदाराचे परवाना तात्काळ स्थगीत करुन अन्य यंत्रणेमार्फत रेशन लागलीच उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.  अपुरे रेशन देवून पुर्ण रेशनवर सही घेणे, महिनोमहिने रेशनचा पुरवठा न करणे. अशा अनेक तक्रारी निवेदनातून ग्रामस्थांनी केल्या आहे.

दरम्यान, भरपावसात निघालेल्या या मोर्चातील ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे याठिकाणच्या रेशन दुकानदारांच्या वर झालेले आरोप पाहता याबाबत प्रशासनाने शहानिशा करने आवश्यक असल्याच मत व्यक्त केल् जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment