---Advertisement---
नंदुरबार : आमदार सत्यजित तांबे आमदार झाल्यानंतर प्रथमच तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात आज शुक्रवारी भेट दिली. यावेळी ‘शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत, सगळ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
तळोदा येथील भगवान बिरसा मुंडा चौकात आमदार सत्यजित तांबे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने, पुष्पगच्छ व फुलहार देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर न्यू हायस्कूल येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. नंदूरबार जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०१९ ते ऑगस्ट २०२१ या तीस महिन्याच्या काळातील प्रोत्साहन भत्याची थकीत रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर समाधान पाटील, आर. बी. कुवर, ए.ए.शेंडे, डी. एन. गिरावे, सी. एच.पाडवी, वाय. बी. पवार, डी. एन. देवरे, के. एन. खैरनार, एस. एस शिरसाठ, एच.जे. पाडवी, एस एन कोडे, एम. एस. पाटिल, के. ए. टवाळे यांच्या आहेत.
आमदार सत्यजित तांबे नंदूरबार जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पहिल्या दिवशी नवापूर, नंदुरबार जिल्हा कार्यालय येथे विविध विषयांच्या बैठका घेतल्या. दुसऱ्या दिवशी शहादा, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा नंदूरबार शहरात वेगवेगळया प्रकारच्या संस्था, संघटना, कामगार ई. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे.