नंदुरबार : काँग्रेसचे खासदार तथा युवा नेते राहुल गांधी यांची आज मंगळवारी नंदुरबारात भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होत आहे. मात्र, काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी याकडे पाठ फिरवली असून, त्यांनी भाजपची वाट धरली आहे.
माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. उद्या ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. राहुल गांधी यांची यात्रा नंदुबारमध्ये येताच बड्या नेत्याने साथ सोडल्याने काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील काँग्रेसचे ब़डे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे.