Nandurbar News : गुढीपाडव्यापासून संतांचे श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले

xr:d:DAFtd8oCXa8:2597,j:1317727233272534415,t:24040915

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील श्री सिद्धिविनायक मंदिरा जवळील संतांचे श्रीराम मंदिर गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे पुरातन संतांचे श्रीराम मंदिर जुन्या पिढीतील लोकांना परिचित आहे. मात्र नवीन पिढीला संतांचे श्रीराम मंदिर अवगत नसल्यामुळे चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दररोज सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी मूर्तींचे दर्शन होत आहे. दि. 17 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून तर राम जन्मोत्सवापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संतांचे श्रीराम मंदिर सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.