नंदुरबार : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. द्रजोत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने तब्बल 14 विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या धवल पाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी चंद्रज्योत या वनस्पतीच्या बिया खाल्ल्या.
त्यानंतर १४ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
दरम्यान, या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.