---Advertisement---

Nandurbar News : नंदुरबारमध्ये दोघा भावांकडून एकाला जबर मारहाण, गुन्हा दाखल

---Advertisement---

नंदुरबार : दुकानासमोरून ये-जा करीत असल्याचा राग येऊन दोघा भावांनी ५२ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण केली. यात दयाराम साठे (५२, रा. खेडदिगर ता. शहादा) यांचा मृत्यू झाला. शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे ९ रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान ही घटना घडली. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे हनुमान मंदिराजवळ आरोपी यशवंत मोरे याचे दुकान आहे. त्या दुकानासमोरून दयाराम साठे ये जा करीत असत. याचा राग येऊन ९ रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान यशवंत मोरे याने दयाराम साठे यांना अडवलं.

”तू आमच्या दुकानाच्या समोरून का जातो ? तुला दुसरा रस्ता नाही का ? असे म्हणत शिवीगाळ केली. यादरम्यान यशवंत मोरे याचा भाऊ अनिल मोरे याने दयाराम साठे यांना लाकडी दांड्याने डोक्यावर तसेच पाठीवर मारहाण केली. यशवंत मोरे याने लाथा बुक्क्यांनी पोटावर मारहाण केली.

या मारहाणीत दयाराम साठे (५२) यांचा मृत्यू झाला. याबाबत आरती जितेंद्र रामोळे यांच्या फिर्यादीवरून अनिल हिरामण मोरे आणि यशवंत हिरामण मोरे दोन्ही रा. खेडदिगर ता. शहादा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment