---Advertisement---

Nandurbar News : नागरिकांची सतर्कता, मंगलपोत चोरताना दोन महिलांना पकडले रंगेहात

---Advertisement---

नंदूरबार : महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लंपास करताना नागरिकांच्या सतर्कतेने दोन संशयित महिलांना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे आज, रविवारी घडली. संशयित चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशेषतः रविवारी येथे आठवडे बाजार भरत असल्याने चोरटे संधी साधत आहे.  त्यामुळे पोलीसांनी गस्त वाढवी अशी मागणी जोर धरू लागली आहे.  नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे महत्त्वाची व मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी, मजूरवर्ग खरेदीसाठी व अन्य कामाच्या निमित्ताने येत असतात.

बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत चोरटे संधी साधत असतात. गेल्यावेळी मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. मात्र, आज चक्क मंगलपोत चोरताना दोन संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे. अशा घटनेमुळे बाजारातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरट्यांना खाकीचा धाक नसल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment