बॅंकेच्या एटीएम केंद्रांत पैशांचा पुरवठा करणा-या व्हॅन मधील 1 कोटी पाच लाखांची रक्कम चाेरी करणाऱ्या संशयिताचा छडा लावण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी राकेश चौधरी या संशयितास अवघ्या 48 तासांच्या आत जेरबंद केले आहे. या प्रकरणी पाेलिस त्याची कसून चाैकशी करत आहेत.
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली हाेती. पाेलिसांनी विविध पथकांची नियुक्ती करुन प्रकरणाचा तपास सुरु केला.
अवघ्या 48 तासांत पाेलिसांनी राकेश चाैधरी या संशयितास नाशिक येथून अटक केली. त्याच्याकडून 50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आज दुपारी संशयित चाैधरी यास नंदूरबार येथे आणण्यात येईल अशी माहिती पाेलिसांनी दिली.
आता उर्वरीत 55 लाखांची रक्कम कुठे गेली याचा छडा लावण पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. चाैधरी यास या प्रकरणात आणखी कोणी मदत केली याचा उलगडा पोलिस तपासानंतर हाेईल.