नंदुरबार : तळोदा तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार मनुष्यासह प्राण्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यामुळे भितीपोटी पर्वत भागातील रहिवासी घर परीसर व रस्त्यावरील वाढलेल्या झाडांची श्रमदानाने सफाई करीत आहे.
बिबट्याचा वावर वाढला असून मनुष्यसह, शेळी, कुत्रा गाय, जनावरांवर खुप मोठे संकट निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी बिबट रस्ता ओलांडताना दिसून आला आहे.
अचानक बिबट समोर आल्याने घाबरून वाहनावरचा ताबा जाऊन अपघात होण्याची शक्यता असते, त्या अनुषंगाने सातपुडा पर्वत रांगेतील भगदरी गावाचा वनवाईपाडा येथील ग्रामस्थांनी संकल्प करुन श्रमदानातून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्याचा निर्णय घेतला. घरपरत एक व्यक्ती पाठवुन श्रमदानाने रस्ता साफ केला.
यावेळी भानसिंग वळवी, बोद्या वसावे, सुरुपसिंग वळवी, जयसिंग तडवी, सायसिंग वळवी, विनायक वळवी, भिका वळवी, कृष्णा वळवी, मधुकर पाडवी, दिनेश वळवी, मानसिंग वसावे, आदिनी परीश्रम कले.