---Advertisement---
नंदूरबार : सुंदरदे येथे विजेच्या शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
तालुक्यातील सुंदरदे रस्त्यावरील दगा सुकलाल माळी हे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतीकामासाठी बैलगाडीने खताच्या गोण्या घेऊन जात असताना शेतात असलेल्या विद्युत खांबमुळे शॉक लागून बैलाच्या जागीच मृत्यू झाला.
यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. नुकसान भरपाईची शेतकरी दगामाळी यांनी मागणी केली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे