नंदुरबार : दलेलपुर ता.तळोदा गावाच्या उत्तरेला भरदिवसा शनिवार, १५ रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्मण झाले आहे तसेच वन विभागाने बीबीट्याला जेरबंद करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दलेलपूर गावाचा उत्तरेला माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांचे शेत आहे. त्या शेतात शेतमजुर काम करीत असताना त्याठीकाणी अचानक बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतमजुर चांगले घाबरूण गेले. बंदिस्त घरात पळाले, बिबटया घरासमोर गेला. हे शेतमजुरानी बदिस्त घराच्या खिडकीमधून मोर्बाइल मध्ये फोटो काढलेत.
अचानक आलेल्या बिबटया त्याठीकाणी काही काळ बसला. त्या ठिकाणापासून हालत नसल्याचे बघून घरात असलेल्या शेतमजुरानी विविध आवाज काढले तरी काही उपयोग होत नाही हे पाहून शेताचे मजुरान सोबत असेल विजय परदेशी यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांना संपर्क करून संबाधित घटना कळवली लगेच त्यांनी वनविभागाला कळवले. दरम्यान, सदर बिबटयाला जेरबद करावा अशी मागाणी येथील नागरिकांकडून करण्यात आली.