---Advertisement---
नंदुरबार : शेतीच्या वादातून मलगाव (ता. शहादा) येथे दोन भावांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतीच्या वाटणीवरुन दोन कुटुंबामध्ये वाद झाला. दोन चुलत भावांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान गावठी कट्यातून दोन राऊंड फायरिंग करण्यात आले. तसंत तलवारीने देखील वार करण्यात आले. यात गोळी लागल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींवर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून एकाची प्रकृती गंभीर आहे त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये आरोपीचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.