(वैभव करवंदकर)
नंदुरबार : महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी रमेश तुकाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील सामाजिक कार्यकर्ते, तसेच बँड व्यवसायातील रमेश तुकाराम मोरे यांच्या समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्यांचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार व महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेश महासचिव रामदास शिंदे यांनी ही नियुक्ती केली.
या निवडीबद्दल धोबी समाज्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश तुकाराम मोरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज बांधव व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉ. राजेंद्र मोरे शनिमांडळ कार्यकारणीचे अध्यक्ष योगेश मोरे, उपाध्यक्ष महेंद्र कपडे, सालागार रतिलाल मोरे, कैलास मोरे, सचिव अरुण डीगराळे , खजिनदार सुनील कापडे, राकेश मोरे , एकनाथ मोरे, शैलेश मोरे, राहुल मोरे, प्रवीण मोरे,समाधान मोरे , सुनील मोरे , गणेश सूर्यवंशी, समाधान नेरकर, पांडुरंग मोरे, गोकुळ कपडे, छोटू मोरे, चंद्रकांत मोरे, मुकेश कपडे आदी उपस्थित होते.