नंदुरबार : जिल्हयातील हरविलेल्या महिला, पुरुष व बालके, अशा एकूण ६२ व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिली.
जिल्हाभरातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात तिनही उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली “ऑपरेशन शोध” मोहिम राबविणेसाठी पथके तयार करुन जास्तीत जास्त हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरु आहे.
त्याअनुषंगाने शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी आपले पोलीस ठाण्यात असई/प्रदिपसिंग डी. राजपुत यांचे नेतृत्वाखाली एक मिसिंग शोध पथक तयार केले.
तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथील मिसिंगचे कामकाज पाहणारे असई/भगवान धात्रक यांचे मदतीने सदर पथकाने उल्लेखनिय कामगिरी करत आतापावेतो एकुण 62 हरविलेले व्यक्ती त्यात 33 महिला तर 29 पुरुषांचा शोध घेण्यात यश मिळवले आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले, असई/प्रदिपसिंग डी. राजपुत, पोकों/कपिल मंदील, मपोकॉ/शिला गावीत यांनी ही कामगिरी केली.