नंदूरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेदरम्यानचा वाद, अर्थात गावित परिवार आणि रघुवंशी परिवारातील तीव्र मतभेद राज्यस्तरीय नेत्यांनीच संयुक्त बैठक घेऊन सोडवावेत, असे आवाहन शिंदेसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले होते. त्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास्थानी भेट देत चर्चा केली. दरम्यान, महायुतीचा तिढा लवकरच सुटणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
काय म्हणाले पालकमंत्री अनिल पाटील ?
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ही स्थानिक परिस्थिती असते. महायुतीचे जे घटक असतील ते सर्व घटक जो काही उमेदवार महायुतीने दिला आहे. त्याला पाठिंबा देतील, ज्यावेळी महायुतीत कुठलाही पक्ष समावेश होतो. त्यावेळी त्या त्या पक्षातील नेत्याचा त्यावर विश्वास असतो. तो विश्वास संपादन करणं गरजेचं असत. येत्या काही काळात जो काही गैरसमज आहे तो दूर होईल. नंदुरबार लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार दोन ते तीन लाखाच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ.हिना गावित, डॉ.सुप्रिया गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, माजी आमदार शरद गावित आदी उपस्थित होते.