मुंबई : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला फडणवीस यांनी जसेच तसे उत्तर दिले होते. त्यांनतर आज बुधवारी भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘महाफडतूस’ म्हणत झापलं.
काय म्हणाले राणे?
नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत असशील तर तू महाफडतुस असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एकेरी उल्लेख करत केला आहे.
जी महिला ओळखीच्या दवाखान्यात अॅडमिट झाली, ती गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामध्ये तिच्या पोटात कुठलीही इजा झालेली नसतांना उद्धव ठाकरे कुटुंबासह भेटायला गेले. बायकोला आणि मुलाला घेऊन गेले म्हणत टीका केली.
उद्धव ठाकरे एकटे कुठेही जाऊ शकत नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी डिलिव्हरीचं काम सुरू केलं का? असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवराळ भाषा वापरुन भाषण केलं, एखाद्या व्यक्तीबद्दल असूया असल्याचे दिसून आले असेही राणे यांनी म्हंटलं आहे.
ख्यमंत्री असतांना अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेले नाही. गुंडगिरी का संपवली नाही. तेव्हा घरात बसून राहिले आणि आता बायकोला घेऊन कुणालाही भेटायला जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः काहीही करू शकत नाही असेही राणे म्हणाले.
ज्या देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोणतेही गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना कायदा सुव्यवस्था निर्माण झाली होती त्याचे काय म्हणत राणे यांनी हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे यांनी यावेळेला सुशांत सिंग यांना का मारलं ? त्याची आत्महत्या नव्हती. ती हत्या होती असा आरोप केला आहे. याशिवाय दिशा सालियान ला का मारलं ? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे असेही राणे म्हणाले आहे.
सचिन वाझे हा गुन्हेगार होता. तरीही त्याला कामावर घेऊन महत्वाचे खाते दिले. सचिन वाझे उद्धव ठाकरे यांचे जावई आहेत का? गुन्हेगारांना मदत करणारा व्यक्ति मुख्यमंत्री होतो हा महाराष्ट्रासाठी कलंक असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.