पाकिस्तानचे वस्त्रहरण…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक कितीही टीका करोत आणि त्यांना कितीही दूषणे देवोत, मोदींच्या दबंग नेतृत्वाने जगात निर्माण केलेले वजन काही औरच आहे.

 

एक काळ असा होता की, भारताला फक्त इतरांचे ऐकावे लागायचे. आताचा काळ असा आहे की, भारत बोलतो आणि जग ऐकत असते. Narendra Modi in SCO शांघाय शिखर परिषदेला संबोधित करताना मोदींनी पाकिस्तानला तोंडावर सुनावले आणि त्यांची खटिया खडी केली. या परिषदेचे यजमानपद भारताच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी भूषविले. या परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि अन्य राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. Narendra Modi in SCO शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) या शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदींनी पाकिस्तानची कानउघाडणी केली आणि एकूणच जगाला दहशतवादाचे गांभीर्य नव्याने पटवून दिले. एससीओ ही राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण यासंदर्भातील सहकार्यासाठी युरेशियन संघटना आहे. Narendra Modi in SCO यात भारत, पाकिस्तान, चीन, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान असे नऊ सदस्य आहेत. याशिवाय, आशिया-युरोपातील अन्य देशांशी संवाद असावा, अशी व्यवस्थाही आहे.

 

Narendra Modi in SCO सध्याचे जग शीतयुद्धाचे नसले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर धृवीय राजकारण आहेच. यात भारताचा वरचश्मा निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवर अमेरिका भारतासोबत आहे. चीनला शह देण्यासाठी भारताला साथ देणे अमेरिकेला भाग आहे. त्या तुलनेत पाकिस्तानसोबत कुणीही नाही. अगदी संपन्न इस्लामी देशदेखील पाकिस्तानच्या सोबत साधारणतः येत नाहीत. सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक विपन्नावस्थेतून जात आहे. Narendra Modi in SCO अशा स्थितीतही पाकिस्तानकडून दहशतवादाला जे पाठबळ दिले जाते, त्याबद्दल एससीओसारख्या व्यासपीठावर बोलणे आवश्यक होते आणि तेच मोदींनी केले. मोदी म्हणाले की, आपल्या संघटनेतील सर्व देशांचे एकमेकांशी हजारो वर्षांपासूनचे संबंध आहेत. आपण एक विस्तारित परिवार आहोत. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, अशी भारताची धारणा आहे. Narendra Modi in SCO त्यामुळेच अन्न, इंधनासारख्या संकटात एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका बनला आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

 

या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे. स्वरूप किंवा अभिव्यक्ती काहीही असो; दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपण एकजूट व्हायला हवे. काही देश सीमापार दहशतवादाचा वापर त्यांच्या धोरणाचा भाग म्हणून करतात, दहशतवाद्यांना आश्रय देतात. Narendra Modi in SCO एससीओने अशा राष्ट्रांवर टीका करण्यात अजिबात संकोच करू नये. एकीकडे जागतिक शांतता आणि सहयोगासाठी आवाहन करायचे आणि दुसरीकडे दहशतवादाला थारा द्यायचा, अशा दुटप्पीपणाला नव्या जागतिक रचनेत जागा असता कामा नये. तरुणांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत. याशिवाय, मोदींनी अनेक विषयांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. भारताची कामगिरी, भारतापुढील आव्हाने, प्रादेशिक स्थैर्याचे व शांततेचे महत्त्व इत्यादी विषयांना त्यांनी हात घातला. Narendra Modi in SCO मात्र, त्यांचा प्रमुख भर होता दहशतवादाच्या मुद्यावर आणि ते त्यांनी नेमकेपणी केले.

 

दहशतवादामुळे सर्वाधिक पोळलेल्या जगातील राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तीन दशकांपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. दीडेक दशकांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांच्या टोळीने मुंबईला वेठीस धरले होते. याशिवाय, भारताच्या अनेक शहरांमध्ये, मंदिरांवर दहशतवाद्यांचे हल्ले झाले आहेत. मोदींच्या कार्यकाळातील दहशतवादविरोधी धोरणाचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी दहशतवादाची नांगी ठेचण्याचा आणि पाकिस्तानला उघडे पाडण्याचा प्रणच केलेला आहे. आता भारताने थेट घरात घुसून हाणायला सुरुवात केली आहे. Narendra Modi in SCO दहशतवादविरोधी लढाईला असे आक्रमक स्वरूप पहिल्यांदाच आले. त्यामुळे स्वतः मोदी असोत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर असोत किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा अधिकारी असो, हे सारेच दहशतवादावर आवर्जून बोलतात. अमका दहशतवाद चांगला, तमका वाईट असे असू शकत नाही. दहशतवाद हा कोणत्याही प्रकारचा असला, तरी तो स्वीकारार्ह असू शकत नाही, ही भारताची भूमिका हे सारे लोक हिरीरीने मांडत असतात. राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक उद्दिष्टांसाठी सामान्य लोकांना किंवा सरकारला घाबरविण्यासाठी दहशतवादाचा वापर एक शस्त्र म्हणून केला जातो.

 

पाकिस्तानात तर दहशतवाद्यांना थेट आश्रय दिला जातो, हे उघड गुपित आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटांचा अपराधी अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीत राहत असल्याच्या वार्ता यापूर्वीच आलेल्या आहेत. असे म्हणतात की, त्याने तिथे दुसरे लग्न केले आहे आणि त्याच्या एका मुलीचे लग्न पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या मुलाशी झालेले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवाला प्रदेशातील अ‍ॅबोटाबाद या शहरात ओसामा बिन लादेनला अमेरिकी लष्कराने संपविले. लादेन तेथे लपून बसला होता, असे म्हणण्यापेक्षा पाकिस्तानने दाऊदप्रमाणेच त्यालाही आश्रय दिला होता. Narendra Modi in SCO दाऊद पाकिस्तानात राहतो, लादेन पाकिस्तानात राहतो, अजमल आमिर कसाब पाकिस्तानातून येतो, अल-कायदा आणि लष्कर-ए-तोयबासारख्या अनेक संघटनांची मायभूमी-आश्रयभूमी पाकिस्तान असते आणि तरीही पाकिस्तानने भारतासह इतरांना शांततेचे धडे द्यावेत, हा मोठा विनोद आहे. अशा दोगल्या देशांना उघडे पाडणे आणि त्यांचा बुरखा फाडणे आवश्यकच असते. नेमके तेच मोदींनी केले आणि ते देखील पाकिस्तानी पंतप्रधान व अन्य राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत केले.

 

Narendra Modi in SCO अर्थात, एवढ्याने पाकिस्तान सुधारण्याची शक्यता नाही. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आणि पाकिस्तानी लष्कर या दोघांचाही दहशतवाद्यांना पाठींबा आहे. जम्मू-काश्मिरातील दहशतवादाला त्यांच्याकडून खतपाणी मिळते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनाही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना साथ देण्याच्या धोरणाची झळ पोहोचली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर दहशतवाद्यांना पोसणारा देश अशी पाकिस्तानची प्रतिमा यापूर्वीच निर्माण झालेली आहे. अशा देशांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नाचक्की करणे, हा आता भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग झालेला आहे. पाकिस्तानचे शिल्पकार मोहम्मद अली जिना यांनी त्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी असे म्हटले होते की, पाकिस्तानला शांतता प्रिय आहे. शेजाèयांशी आणि एकूणच जगाशी आम्हाला मैत्रीचे संबंध ठेवायचे आहेत. आमचा संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेवर विश्वास असून जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी पाकिस्तान योगदान देईल. वर्तमान भलतेच आहे.

 

शांतता आणि समृद्धी या दोन गोष्टींचा आपसात संबंध असतो, हेच पाकिस्तान विसरला. त्या देशात शांतता नाही. शेजारी व अन्य देशांना तो शांत राहू देत नाही. पाकिस्तानच्या वाट्याला आलेली विपन्नावस्था हे त्या देशाच्या चुकीच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचे फळ होय. Narendra Modi in SCO शिक्षण, संशोधन, इन्फ्रास्ट्रक्चर अशा सर्व गोष्टीत भारतासारखा इतके वैविध्य सांभाळणारा देश प्रगत जगाच्या बरोबरीने येत असताना त्याच्या सोबतच स्वतंत्र झालेला शेजारचा देश अधोगतीला लागत असेल तर तो त्याच देशाचा दोष आहे. मोदींनी पाकिस्तानला आरसा दाखवण्याचे काम केले. त्यातले मर्म समजून घेतले तर त्यात पाकिस्तानचेही हित आहे. पण, मुळात चेहराच वाकडा असेल तर आरशाने करायचे तरी काय, हा प्रश्न तरीही शिल्लक उरतोच.