नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळत आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत २२ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ताज्या सर्वेक्षणात पीएम मोदींना ७८ टक्के रेटिंग्स मिळाले आहे.
मॉर्निंग कन्सल्टचे हे रेटिंग २६ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यानचे आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसर्या क्रमांकावर आहेत. त्यांची अप्रुव्हल रेटिंग ६८ टक्के आहे. यानंतर तिसर्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचे रेटिंग ५८% आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचे रेटिंग ५२ टक्के आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत ५० टक्के रेटिंगसह ५ व्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग ४० टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नाव येते. त्यांची रेटिंग ४० टक्के आहे. भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत १०व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग ३० टक्के आहे. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या यादीत ११व्या स्थानावर आहेत. त्याचे रेटिंग २९ टक्के आहे.
Global Leader Approval: *Among all adults
Modi: 78%
López Obrador: 68%
Albanese: 58%
Meloni: 52%
Lula da Silva: 50%
Biden: 40%
Trudeau: 40%
Sánchez: 36%
Scholz: 32%
Sunak: 30%
Macron: 29%
Yoon: 23%
Kishida: 21%
*Updated 01/31/23https://t.co/Z31xNcDhTg pic.twitter.com/rxahbUCB0x— Morning Consult (@MorningConsult) February 2, 2023