एथेन्स : चंद्रयान-3 चे यश हे केवळ भारत अथवा भारतीय वैज्ञानिकांचेच यश नाही, तर हे संपूर्ण मानव जातीचे यश आहे. संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी विज्ञानाचे अशा पद्धतीचे धाडस आणि यश फार महत्वाचे आहे. यातही चंद्रयान-3 चंद्राच्या ज्या पृष्ठभागावर उतरले आहे, मला वाटते की, यातून जे परिणाम बाहेर येतील ते विज्ञान जगत आणि संपूर्ण मानवजातीला चांद्रासंदर्भातील जिज्ञासा आणि भविष्यातील योजनांसाठी उयुक्त ठरतील, असे पंतप्रधा नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सध्या ग्रीस दौऱ्यावर आहेत. एथेन्समध्ये ग्रीक राष्ट्रपती कॅटरीना एन. यांनी चंद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. यानंतर मोदी बोलत होते.
दक्षिण आफ्रिकेत 15वे ब्रिक्स शिखर सम्मेलनात भाग घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी ग्रीसमधील एथेन्स येथे पोहोचले आहेत. ग्रीसमध्ये पोहोचताच ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेटेरिटिस यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या खास निमंत्रणावरून नरेंद्र मोदी अथेन्सला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विमानतळावर दाखल झाले होते. नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर हजारो लोकांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी ग्रीस येथून थेट बेंगळुरू येथे पोहोचून, चंद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे अभिनंद करू शकतात. यानंतर ते दिल्लीला जातील. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे.