Narhari Zirwal : 24 आमदारांना घेऊन राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांची आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यावेळी 24 आमदार त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राज्यपालांची भेट घेण्यामागचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, आदिवासी विकास सोसायटीच्या प्रश्नावरुन नरहरी झिरवाळ यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात.

त्यामुळे आदिवासी समाजाचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत आहेत.