खोटारडा अहंकार संपवते नर्मदा परिक्रमा

तरुण भारत लाईव्ह न्यूज । आरती दीक्षित ।  नर्मदा मय्या जी की आपल्यात वास करणार्‍या सर्व प्राणीमात्रांना… मगर, कासव, मासे, इतर जीव याची आईप्रमाणे काळजी घेणारी आहे. अशी ही मय्या तिच्या भक्तांची ही अशीच काळजी घेते म्हणूनच तिच्या केवळ दर्शनाने सृष्टीतील हे जीव पापमुक्त होतात.

हिंदू धर्मातील अनेक साधू, संत यांनी मोक्ष प्राप्तीसाठी याच नर्मदा मातेत स्वतःला सामावून घेणे पसंत केले. तर अशा या नर्मदे मय्याची परिक्रमा करण्याच योग केवळ तिच्याच कृपेने आला आणि तिच्याच आशिर्वादामुळे पूर्णही झाला… ‘नर्मदे हर समूहा’बरोबर सुरुवात केली. त्यावेळी मनात हजारो प्रश्र्न, शंका होत्या, परंतु त्याचबरोबर हाही विश्र्वास होता मय्या आहे न बरोबर करवून घेते.

सारं काही लेकराला कशाला ती एकटे सोडेल… या विचाराने पायात बळ येत होते… पावलं गुळगुळीत गोट्यावरुन भराभर चालू लागली… अर्ध्या वाटेतून मय्याची गार मऊ वाळू नवीन उभारी देत होती. पहाटेचा गार वारा… साथीला होता तर सुंदर केकावली ऐकायला येत होती, जणू सारी सृष्टी मय्याची आरती करत होती… नर्मदे हर…

तर परिक्रमेत सगळ्यात प्रकर्षाने जाणवते ते तेथील बंधू-भगिनी यांनी चालवलेले ’अन्नछत्र… उद्देश हाच कोणीही परिक्रमावासी अथवा मय्याचा कोणीही भक्त उपाशी राहू नये… किती मोठा विचार!
ते हातात पदार्थ घेऊन रस्त्यावर उभे..आवो मय्या खा लो भूक लगी होगी… थोडासा लेलो… पाणी लेलो… तिथे काय नव्हते चहा, कॉफी, पोहे, खिचडी, कढी, पुरी भाजी… सारं काही भरभरुन होतं… क्षणात वाटले देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी प्रेमळ आग्रह पाहून भरुन येत होतं… खरंच देणार्‍याचे हात देवाचे असतात.

या पांढरपेशी जगात एक एक रुपयाचा हिशेब ठेवणारे तुम्ही आम्ही आणि सदैव जागी राहून स्वत: पदार्थ बनवून देणारी मंडळी; हे पाहून मन वारंवार त्यांच्या पायाशी नतमस्तक होत होतं… या विशाल भारतीय संस्कृतीचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत होता. या मंडळीचं दान देण्याचं मन हे मय्याच्या पात्रासारखे विशाल आहे. हे पहिले क्षणात खोटारडा अभिमान गळून गेला… नर्मदा मय्या खरंच जागा दाखवते ती खरेपणाची तिथे गाळण होऊन जाते खोटेपणाची आणि एक शिकवण देऊन जाते, देत रहा याची देण्यातली सुख अनुभवातला तिच शिकवते म्हणूनच करावी परिक्रमा.

मानवी जीवन अनेकविध मूल्यांनी नटलेलं तर आपण मात्र इर्षा, अभिमान, माया, मोह, दिखावा या दागिन्यांनी उगाचच नटतो. खरं तर देणे या सुंदर दागिन्यांनी नटलं तर खर्‍या अर्थाने मोक्ष प्राप्त होईल हे शिकवते मय्या.
…मय्याच्या पाण्याचा गार स्पर्श जणू काही ती तिच्या भक्तांना अंगा-खांद्यावर लहान बालकासारखी खेळवतेय…

नर्म म्हणजे… हास्य. दे म्हणजे दे… देणारी. अशी ही आनंद आणि हास्य देणारी मय्या ही शिवकन्या आहे. सगळ्यांचे दुष्ट शक्तीपासून रक्षण करते म्हणूनच आजपर्यंत मय्या कितीही पूर आले तरी तिने कोणत्याही प्रकारचे नुकसान केले नाही. उलट सर्व जीव लेकराप्रमाणे पोषतच आली आहे.

याच मय्याच्या गोट्यापासून शिवलिंग बनवतात आणि त्याची वेगळी अशी प्राणप्रतिष्ठा करण्याची गरच नसते… या सगळ्यामुळे मातेला वर प्राप्त झाला आहे सारं काही कालाओघात लुप्त झाले तरी मय्या अविरत वाहणार आहे… नर्मदे हर… निरोप घेताना तिच्या विशाल पात्राकडे पाहताना, ओंजळीत पाणी घेताना, कृतार्थतेने आलेले अश्रू तिने तिच्या पाण्याने कधी मायेने पुसले समजलेच नाही… नर्मदे हर…