नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला.
सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश?
भारत वाघमारे- नगराध्यक्ष,
सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता)
भगवान आहेर- नगरसेवक
पुष्पाताई वाघमारे – नगरसेविका
अरुणाताई वाघमारे – नगरसेविका
प्रमिलाताई वाघमारे – नगरसेविका
दिनेश वाघ – कार्यकर्ते
विलास गोसावी – कार्यकर्ते
चारोस्कर – कार्यकर्ते
गौरव सोनवणे – कार्यकर्ते