जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवत त्यांची विधान परीषदेच्या गटनेते पदी निवड केली असून या संदर्भात घोषणा विधान परीषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी केली आहे. विधान परीषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल हे सर्व गणित पाहता त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रतोदपदी अनिकेत तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथराव खडसे यांची विधान परीषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र विधान परीषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांना देण्यात आल्यानंतर आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. विधान परीषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, खडसे यांना अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानप परीषदेवर आमदार झाले असून आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जवाबदारी सोपवली आहे.