जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम आहे. जळगाव व रावेर लोकसभानिहाय दोन अध्यक्ष निवड करण्यावर प्राथमिक नर्णय झालेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पक्षाचा जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत निर्णय लोकसभा निवडणूक नकालाच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला होता. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला माजी मंत्री गुलाबराव देवकरासह इतरांनी अनुमोदन दिले होते.
पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना जळगाव येथील जिल्हाध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार ते जळगाव येथे आले होते. त्यांनी बैठक घेवून माहिती दिली तसेच त्यांनी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. तब्बल नऊ ते दहा जणांनी मुलाखतीही दिल्या होत्या. तर काही जणांनी माजी मंत्री सतीश पाटील किंवा गुलाबराव देवकर यांना िजल्हाध्यक्ष करावे असा प्रस्ताव दिला होता.
दरम्यान, जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना ठाकरे गटाचे दोन जिल्हाध्यक्ष आहेत. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटातर्फेही दोन जिल्हाध्यक्ष करण्यात यावेत असा निर्णय वरीष्ट स्तरावरून घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून त्या दृष्टीने आता उमेदवारांचा शोध सुरू आहे.
डॉ. पाटील, देवकरांचा नकार
जिल्हाध्यक्षपदी ज्यांचा नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. ते माजी – मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांनी पद घेण्यास नकार दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक असल्याने तसेच त्यांची उमेदवारी असल्याने त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रमोद पाटील, श्रीराम पाटील निश्चित ?
जिल्हयात दोन अध्यक्ष देण्याचा निर्णय झाल्याने जळगाव लोकसभा मतदार संघातून चाळीसगाव येथील पक्षाचे कार्यकर्ते जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील तर रावेर लोकसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी नुकतेच पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविणारे श्रीराम पाटील यांचे नाव निश्चीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही. जळगाव जिल्ह्यासाठी जळगावचा रहीवाशी असावा असे मत व्यक्त होत असल्याने इच्छुकातील नाव जाहीर होवू शकते असेही सांगण्यात येत आहे