आंबा खाताय.. थांबा! आंबा केमिकलयुक्त तर नाही? कसा ओळखाल नैसर्गिक आंबा?

Mangos : बाजारात आता आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा खाण्यासाठी प्रत्येकाला आवडतं. परंतु, आंबे खाण्याचा उत्साहात अनेकदा लोक केमिकलयुक्त आंब्यांची खरेदी करतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला केमिकलयुक्त आंबे ओळखण्यासाठी काही टिप्स देणार आहोत.

बरेच व्यापारी भरघोस नफा मिळविण्यासाठी रसायने आणि कार्बाइड्स वापरून आंबे पिकवतात. जर तुम्ही ते खाल्ले तर ते शरीराच्या मज्जासंस्थेपर्यंत पोहोचते, ज्यामुळे आरोग्यास गंभीर नुकसान होते. म्हणूनच असे आंबे खाणे हानिकारक ठरू शकते.

नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्याची वेगळी पद्धत असते. यासाठी झाडावरून आंबा तोडून तो उबदार ठिकाणी पेंढ्यामध्ये झाकून ठेवला जातो. मात्र हल्ली केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जातात. म्हणजेच त्यात कार्बन मोनॉक्साईड, अॅसिटिलीन, कार्बाइड यांचा वापर केला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

केमिकलयुक्त आंबे खाल्यास मज्जासंस्थेचे नुकसान होते. यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. याशिवाय कर्करोगासारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात. त्यात त्वचेचा कर्करोग, कोलन कर्करोग, मज्जासंस्था, मेंदूचे नुकसान, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांचा समावेश होतो.

केमिकल वापरून पिकवलेले आंबे ओळखणे फारसे अवघड नाही. हे आंबे काही ठिकाणी पिवळे तर काही ठिकाणी हिरवे दिसतात. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर हिरवे डाग दिसत नाहीत. त्यामुळे ज्या फळांवर हिरवे डाग दिसतात त्या फळांपासून दूर राहा.

केमिकलने पिकवलेले आंबे कापल्यावर ते आतून कुठे पिवळे तर कुठे पांढरे दिसतात. तर नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आतून पूर्णपणे पिवळे दिसतात. रसायनयुक्त फळे खाल्ल्याने तोंडाला तुरट चव येते आणि तोंडात थोडी जळजळ होते. त्यामुळे महागडे आंबे विकत घेताना आणि खाताना तुम्ही या सर्वच गोष्तउंची काळजी नक्की घ्या.