Navapur : नवापूर महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानातर्गत विविध उद्योगांना भेटी

 Navapur  :     कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या   विद्यार्थी विकास विभागामार्फत सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानातर्गत   नवापूर परिसरातील विविध उद्योगांना भेटी देण्यात आल्या

 

इसराइल आईस फॅक्टरी ला भेट देण्यात आली. बर्फ कशा पद्धतीने बनवला जातो. त्याविषयीची माहिती विद्यार्थिनींनी जाणून घेतली. त्यानंतर मत्स्य व्यवसाय उद्योगाला भेट देण्यात आली. मासे टिकवणे व त्याची निर्यात करणे, माशांपासून मासळी बनवणे. इत्यादींची माहिती विद्यार्थिनींनी घेतली.

 

गुजरात मधील सुंदरपूर या ठिकाणी गूळ तयार करण्याच्या कारखान्याला भेट देण्यात आली. गुळ कशा पद्धतीने बनविला जातो. त्याची पॅकिंग कशी केली जाते. याविषयीची माहिती विद्यार्थिनींनी जाणून घेतली.

 

विद्यार्थिनींमध्ये उद्योग व्यवसाय निर्माण करणे व नेतृत्व क्षमता विकसित व्हावी या दृष्टिकोनातून ही क्षेत्रभेट दौरा आयोजित करण्यात आला.

 

प्राचार्य डॉ. ए. जी.जयस्वाल , उपप्राचार्य प्रा.वाय.जी.भदाणे ,उपप्राचार्या डॉ.मंदा गावित मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एच.बी.सरतापे प्रा. ए.ए. मुळे यांनी नियोजन केले. तसेच प्रा. इंदास गावित सर, प्रा.अंतेश गावित, प्रा. अनिल गावित प्रा. प्रदीप गावित, प्रा. अंकुश गावित यांनी क्षेत्रभेटीसाठी परिश्रम घेतले महाविद्यालयातील सर्व प्रा. बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.