Nawapur : आदिवासी विचारधारा अत्यंत महत्त्वाची देणगी भारताला देऊ शकते म्हणून आदिवासी विचार झालेला पेटंट मिळवून घेणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी राष्ट्रीय चर्चासत्रात केले.
विसरवाडी येथील लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालयात एक दिवशीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा परिषद नंदुरबार येथील महिला व बाल विकास विभाग सभापती संगीता गावित यांच्या हस्ते झाले. मुख्य अतिथी म्हणूनकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आधिसभा सदस्य डॉ. मंदा गावीत, आर डी देवरे महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, डॉ. पुष्पा गावित, तुकाराम गावित, संदीप अग्रवाल, प्रतिक अग्रवाल CA, जयसिंग गावित, ॲड. बाळू गावित होते तर विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरत गावित अध्यक्षस्थानी होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, तेलंगणा पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, दादरा नगर हवेली, उत्तराखंड इत्यादी राज्यातून आदिवासी लोकधारा आणि संस्कृतीवर संशोधन करणारे सुमारे १४० संशोधक, प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यांनी आपापले शोध निबंध सादर केले त्यापैकी सुमारे ४५ संशोधनकर्त्यांनी आपले शोध निबंध आभासी (Online) पद्धतीने सादर केले. प्राप्त शोध निबंधापैकी निवडक युजीसी केअर लिस्टेड जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभा प्रसंगी आदिवासी संस्कृतीची झलक म्हणून वऱ्हाड आणि हल्दी गीत, होब पूजन आणि रोडाली गीताचं सादरीकरण करण्यात आले. शोध निबंध वाचन सत्राचे साधन व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून शहादा येथील भूगोलाचे प्राध्यापक डॉ. उत्तम निळे आणि कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ कलबर्गी (कर्नाटक) येथील प्रा. डॉ. अनिल कांबळे उपस्थित होते तर परिक्षक म्हणून डॉ. नरेंद्र तायडे, एरंडोल आणि डॉ. विशाल करपे यांनी काम पाहिले.
चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केल्याचे मनोगत संशोधक अमर वांगड (सेल्वासा) पुनम गोसावी (नाशिक) मिनी अब्राहम (छत्तीसगड) ॲलविन जोसेफ (केरळ) डॉ. भूमिधर रॉय (प.बंगाल) छोटू मावची (जळगाव) निशांत शेंडे(नंदुरबार) आणि डॉ. रंजीत आठवले (दोंडाईचा) यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ. आनंदा काळबांडे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयश्री गावित यांनी तर चर्चासत्राचे समन्वयक संतोष धनेधर यांनी आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा. बी. व्ही. गावित, प्राचार्य एन. बी. आहीरराव, प्रा. आर बी पाटील, सह-समन्वयक डॉ. एस आर राठोड, संयोजन समन्वयक प्रा. अजित हिरकणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ राहुल ठाकूर, प्रा. आय. यू. शेख (दहीवेल), अनिल गावित, विलास गावित, मगन गावित, योहसवा गावित, डॉ. सुनील पवार, रणजीत गावित, राजेश मावची, किशोर वसावे, शरद चौधरी, संजय गावित, वनमाला गावित, विष्णू गावित आणि संजय साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले.