---Advertisement---

Sunil Tatkare : निवडणुका घड्याळावरच; राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावातून फुंकले रणशिंग

---Advertisement---

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढविणार आहे. तसेच महायुती असली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जळगावात मांडली. दरम्यान राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात जळगावातून होत असल्याची घोषणा करीत प्रांताध्यक्ष तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा आढावा बैठक गुरूवारी शहरातील एका हॉटेलात पार पडली. यावेळी ते बोलत होते. प्रांताध्यक्ष खा. तटकरे पुढे म्हणाले की, मे व जून महिन्यात अवकाळी तसेच वादळामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासानाने शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्याच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन करीत कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देतांना मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.

---Advertisement---

पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्रात पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगला जनाधार असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री अनिल पाटील सुनिल मगरे, कल्याण आखाडे, माजी मंत्री डॉ.सतिष पाटील, गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन केले.

माय माऊलीमुळेच आम्ही सत्तेत


लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी राज्यात मंत्रीमंडळ स्थापन केले होते, चार-पाच मुख्यमंत्रीही ठरले होते, मात्र माय माऊलींनी विधानसभा निवडणुकीत असे बटन दाबले की, विरोधक घायाळ झाले. या माय माऊलींमुळेच आम्ही सत्तेत बसलो असल्याचे प्रांताध्यक्ष खा. तटकरे यांनी मान्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---