नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीने दोन व्हीप काढले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढला तर शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हीप काढला आहे. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ होणार आहे. या राजकीय गोंधळानंतर राष्ट्रवादीचे खासदार मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अविश्वास प्रस्तावावर जेव्हा लोकसभेत चर्चा होते. तेव्हा मतदान देखील होत असते. या मतदानात राष्ट्रवादी भूमिका ठरणार आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. यापैकी ४ महाराष्ट्रातील आहेत. तर एक खासदार लक्षद्वीपचे आहेत. सुप्रिया सुळे, मोहम्मद फैझल, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे आहेत तर सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे कुठल्या व्हीपला लोकसभा अध्यक्ष अधिकृत मान्यता देतात. यावर पुढच्या कारवाईचे भवितव्य अवलंबून आहे.