नवी दिल्ली : दिल्लीत आज एनडीएची बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांना मोदींच्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बोलतांना सांगितलं होतं की, एनडीएमध्ये ३८ पक्षांचा सहभाग आहे. विरोधी गटाकडे ना नीती आहे ना नेता.. त्यामुळे घराणेशाही जपण्यासाठी त्यांचं संघटन सुरु आहे. दुसरीकडे आम्ही देशहितासाठी एकत्र येत असल्याचं नड्डांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘एनडीए’च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था असल्याने भाजपला हे नेते किती महत्त्वाचे वाटत आहेत, हे दिसून येतंय.