भुसावळ : भुसावळात शुक्रवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र हे भुसावळच असून भूकंपाचे धक्के लगतच्या 50 किलोमीटर क्षेत्रात जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी भुसावळातील पत्रकार परीषदेत दिली आहे.
तसेच आपत्तीव्यवस्थापन यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून नागरीकांनी सोशल मिडीयावरील कुठल्याही अफवांना बळी पडू नये, तसे कुठल्याही बातमीची अधिकृत खातरजमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भूकंपाच्या धक्क्याने कुठेही जिवीत वा वित्तहानी झाल्याचे वृत्त आले नसल्याचे सांगून त्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेशही दिले आहे.
दरम्यान, भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रेक्टर स्केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली. शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्के बसल्याचे नागरीकांनी सांगितले. शहरात या चर्चेला उधाण आले होते.