सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज : पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ

---Advertisement---

 

जळगाव : सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त वाढवणार तसेच मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये असे आवाहन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले. त्यांनी सोनीनगरचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाची आरती नंतर नागरिकांशी संवाद साधला.

सोनी नगरात गुरुवारी रात्री ८.३० वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डीबी पथकाचे पोलिस कर्मचारी सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, सोनी नगराचे सामाजिक कार्यकर्ते नरेश बागडे, विनोद निकम, मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, सरदार राजपूत, नारायण येवले, यशवंत पाटील, अजय बागडे, सोपान पाटील, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, ताराचंद जोगी, निंबा महाले, हेमंत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुधाकर अंभोरे , सुशील चौधरी यांचे मंडळाचे कार्यकर्ते केतन पाटील , दीपक महाले, निलेश माळी यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक गुंजाळ पुढे म्हणाले की, सोनी नगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये. दानपेटी दर आठवड्याला उघडण्यात यावी. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना कळवावे. आता रामानंद नगर पोलिस स्टेशन महाबळ कॉलनीत आल्याने अंतर जास्त असल्याने पोलिसांना सोनी नगर मध्ये पोहचता पोहचता वेळ लागू शकतो म्हणून नागरिकांनी लोकसभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशन सहकार्य असून पोलिस प्रशासनच्या नेत्रम विभागाला कॅमेरे जोडण्यात येईल त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेसाठी खर्च लागत असल्याने लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून १० सीसीटीव्ही कॅमेरे

मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून सोनी नगर परिसरासाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी केतन पाटील, दीपक महाले, निलेश माळी, उमेश येवले, पवन भोई, ओंकार जोशी, कृष्णा जोशी, कृष्णा भोई, उदय महाले, पीयुष कोळी, अभिषेक हिवराळे, हेमंत सूर्यवंशी ,वेदांत बागडे,तुषार जाधव, तसेच सोनी नगरातील महिला मंडळ व युवकांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---