जळगाव : नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून, आता ही परीक्षा वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. चाळीसगावमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. शिवाय NTA च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा ही नीट मानली जाते. पण याच परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. 5 मे पासूनच NEET च्या परीक्षेविषयी एकापोठापाठ एक गंभीर आरोपांची मालिका सुरु झाली आहे. ती मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी परीक्षेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली आहे.
वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली NEET ची परीक्षा 5 मे ला झाली आणि बिहारसह इतर राज्यातून पेपर फुटल्याचे समोर आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. एवढंच नाही तर आता जाहीर झालेल्या निकालातही त्रुटी दिसून आल्याने परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप सुरु झाला आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, एनटीएने NEET परीक्षेत घोटाळा केलाचा आरोपवरून चाळीसगावमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. शिवाय NTA च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. चाळीसगाव तहसील कचेरीच्या दिशेने विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी 2024 NEET पेपर लीक झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. झालेली नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.