जळगाव : नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस नदीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार, २३ रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडीजवळ घडली. आता या बस अपघातातील भाविकांची यादी समोर आली आहे.
अपघातातील भाविकांचे नावे
अनंत ओंकर इंगडे, सीमा अनंत इंगडे, सुहास राणे, सरला राणे, चंदना सुहास राणे, सुनील धांडे, निलीमा सुनील धांडे, सुळशीराम तायडे, सरला तुळशीराम तायडे, आशा समाधान बाविस्कर, रेखा प्रकाश सुरवाडे, प्रकाश नथू सुरवाडे, मंगला विलास राणे, सुधाकर बळीराम जावडे, रोहिणी सुधाकर जावडे, विजय कडू जावडे, सागर कडू जावडे, भरती प्रकाश जावडे, संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्णी संदीप सरोदे, हेमराज राजाराम सरोदे, रुपाली हेमराज सरोदे, अनुप हेमराज सरोदे, गणेश पांडुरंग भारंबे, मूलभा पांडुरंग भारंबे, मिलन गणेश भारंबे, परी गणेश भारंबे, शारदा सुनील पाटील, रुमुदिनी रवींद्र भारंबे, शारदा सुनील पाटील, निलीमा चंद्रकांत जावडे, ज्ञानेश्वर नामदेव बोन्डे, आशा ज्ञानेश्वर बोन्डे, आशा पांडुरंग पाटील, पंकज भागवत भंगाळे, वर्षा पंकज भंगाळे, प्रवीण पांडुरंग पाटील, अविनाश भागवत पाटील, अनिता भागवत पाटील, मुर्तिजा (ड्रॉयव्हर, पूर्ण नाव माहित नाही), रामिजल (कॅन्डक्टर, पूर्ण नाव माहित नाही) असे बस अपघातील भाविकांचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. दरम्यान, बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडा जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह १४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.