---Advertisement---
तरुणांच्या हिंसक निदर्शनांनंतर, नेपाळ सरकारमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान केपी ओली देश सोडून दुबईला जाऊ शकतात. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला.
काठमांडूसह देशाच्या अनेक भागात निदर्शकांनी तोडफोड केली आणि जाळपोळ केली. यापूर्वी पंतप्रधान कोपी ओली यांनी राजीनामा दिला होता. केपी ओली यांच्या राजीनाम्यानंतर काठमांडूच्या रस्त्यावर हजारो तरुण जमले आहेत. ओली यांच्या राजीनाम्यानंतर सर्वांनी विजयी मोर्चा काढला.
नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी पुढाकार तीव्र झाला आहे. निदर्शकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घराला आग लावली. यादरम्यान त्यांच्या पत्नी रवी लक्ष्मी पेंटर गंभीर जखमी झाल्या. एका निदर्शकाने म्हटले की, “जनरल-झेड निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली आहे. काल नेपाळ पोलिस कर्मचाऱ्यांनी १९ विद्यार्थ्यांना ठार मारले. हा निषेध सोशल मीडियावरील बंदीमुळे नाही, तर आम्ही निषेध करत आहोत कारण आम्हाला एक तरुण नेता हवा आहे. आम्हाला बदल हवा आहे.”दुसऱ्या दिवशीही सरकारविरोधी निदर्शने तीव्र होत असताना काठमांडू आणि कांतिपूरमध्ये मोठ्या संख्येने निदर्शकांनी मीडिया हाऊसची तोडफोड केली.
सोमवारी निदर्शने आणि पोलिसांशी झालेल्या हिंसक झटापटीत १९ जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. जवळपास ३०० जण जखमी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर नेपाळ संसदेबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. राजधानीतील डझनभर ठिकाणी अशांतता पसरत आहे, ज्यामुळे जनतेचा रोष आणि सरकारच्या निर्णयाविरुद्ध राग दिसून येत आहे.