चोपडा : चोपडा आगारात दाखल झालेल्या नवीन बीएस 6 वाहनांचे आज आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी माजी आमदार लता सोनवणे, आगार प्रमुख महेंद्र पाटील उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीवरून राज्याचे परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चोपडा आगारास एसटीच्या ताफ्यात नवीनचं दाखल झालेल्या बी एस6 दहा वाहने देण्याचे जाहीर केले. त्य अनुषंगाने आज २ एप्रिल रोजी नविन पाच BSVI बस मिळाल्याने आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार लता सोनवणे, आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

आगाराचा संपूर्ण परिसर रांगोळीने तर नविन बसेस फुलांनी सुशोभित करुन बसेसची पुजा करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यींनी शिक्षक दिनेश बाविस्कर व महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम नृत्य सादर करून लक्ष वेधुन घेतले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, माजी उपसभापती एम व्ही पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानक प्रमुख परेश बोरसे,वाहतुक निरीक्षक नितीन सोनवणे, सिध्दार्थ चंदनकर,,लेखाकार ईश्वर चौधरी,अतुल सोनवणे शाम धामोळे काशिनाथ कोळी, मधुसूदन बाविस्कर, नरेंद्र जोशी, कांतीलाल पाटील अनिल बाविस्कर, भगवान नायदे,चंद्रभान रामसिंग, संदिप पाटील,मुन्ना ठाकुर सह कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.