ट्र्राय करा मक्याचे नवीन पदार्थ

तरुण भारत लाईव्ह । २४ जानेवारी २०२३। मक्याचे कणीस हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडत. मस्तपैकी कणीस भाजून त्यावर चाट मसाला आणि बटर घालून खायला कोणाला नाही आवडणार. पण मक्याचे कणीस भाजून खाण्यापेक्षा आपण मक्याचा एक चविष्ट पदार्थ घरी करून खाऊ शकतो. मक्यापासून तयार केले जाणारे मक्याचे कटलेट घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारत’च्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे, मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, रवा, मीठ, तेल

कृती
सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवा त्यासोबतच मक्याचे दाणे सुद्धा उकडून घ्यावे लागतील. कुकरच्या चार शिट्या करा त्यानंतर पावाचे स्लाइस पाण्यातून काढून घ्या व पिळून घ्या. हा गोळा किसलेला बटाटा व मक्याच्या दाण्यात मिसळा. त्यानंतर आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट करून हे मिश्रण गोळ्यात मिक्स करा. मीठ घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पाहा. एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.