नंदुरबार : पोलीसांना आपले दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करुन गुन्हे तपास, रात्रगस्त (पेट्रोलिंग), आरोपींचा पाठलागसाठी जिल्हयातील अतिदुर्गम भागात देखील जावे लागते. यामुळे नवीन व सक्षम अशा वाहनांची गरज पडत असते. त्यासाठी चांगली वाहने पोलीस ताफ्यात असणे गरजेचे असते. या नव्या वाहनांमध्ये अत्याधुनिक सुविधा असुन त्यांचा वापर गुन्हेगारी नियंत्रण, आपत्कालीन सेवा, तसेच शहरातील आणि ग्रामीण भागातील गस्तीसाठी होणार आहे.
त्याअन्वये जिल्हा नियोजन समितीकडुन पोलीस विभागासाठी मंजूर 09 नवीन वाहनांचे जिल्हयाचे पालकमंत्री ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांचे हस्ते पोलीस मुख्यालयाचे मैदानावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “सदर वाहने ही पोलीस दलाचे दैनंदिन कार्यात खुप महत्वाची भूमिका बजावतील आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी असतील. वाहनांचे लोकार्पण कार्यक्रमावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे असे उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्र्यांचे हस्ते “पोलीस महासंचालक”
नंदुरबार : महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्हाची यादी जाहीर करण्यात आली होती, त्यामध्ये नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना सन 2024 या वर्षातील उत्कृष्ट तपासाकरीता “पोलीस महासंचालक” यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी परभणी सेलु येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन कार्यरत असतांना सेलु पोलीस ठाणे येथे दाखल खुन व खुनाचा कट रचणे असा गंभीर आणि क्लिष्ट प्रकारातील गुन्हयाचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत गुन्हयातील फॉरेन्सीक पुरावे, डिजीटल पुरावे, तांत्रिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे आधारे गुन्हा उघड करुन गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केला व त्याअन्वये गुन्हयातील आरोपींना शिक्षा झाली होती. त्याआधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना “पोलीस महासंचालक” यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते.
सदर सन्मानचिन्ह आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीचे कार्यक्रमात जिल्हयाचे पालकमंत्री ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांचे हस्ते पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्य. अधि. सावन कुमार असे मान्यवर उपस्थित होते.