बीजिंग : चीनमध्ये एका नवीन विषाणूने पुन्हा एकदा कहर केला आहे. चीनमधील झोंगशान शहरात H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका ५६ वर्षीय महिलेला मृत्यू झालेला आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार , H3N8 बर्ड फ्लूमुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच मुळात त्या महिलेला निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्या महिलेला कर्करोग ही झाल्याचे तपासात समोर आले आहे.
H3N8 फ्लूचा विषाणू सामान्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो, परंतु तो घोड्यांमध्येही आढळतो आणि कुत्र्यांना फ्लू होण्यास सक्षम असलेल्या दोन विषाणूंपैकी एक आहे. चीनमध्ये नोंदवलेले नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचे फक्त तिसरे प्रकरण आहे आणि प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण आहे. या विषाणूमुळे पहिल्यांदाच एखाद्याचा मृत्यू झाला आहे.WHO च्या म्हणण्यानुसार, आजारी पडण्यापूर्वी महिलेला बाजारात जिवंत कोंबड्यांच्या संपर्कात आली होती. तसेच ज्या बाजारात महिलेला संसर्ग झाला तिथे केलेल्या नमुन्याच्या चाचणीत H3N8 फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. मात्र तरी देखील मृत्यू झालेल्या महिलेच्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कांपैकी कोणालाही संसर्ग किंवा रोगाची लक्षणे आढळली नाहीत.