Mayuri Thosar : वाढदिवस साजरा करण्यासाठी माहेरून दिले होते पैसे ; दुसऱ्यादिवशी मयुरीच्या निर्णयाने सर्वच हादरले…

---Advertisement---

 

Mayuri Thosar : जळगाव : राज्यात सासरच्या जाचाला आणि छळाला कंटाळून विवाहित महिलांच्या जीव देण्याच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगावात उघडकीस आली असून, एका 23 वर्षीय नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

जळगाव शहरातील सुंदर मोती नगरात ही घटना घडली असून, मयुरी ठोसर (वय २३) असे मृत नवविवाहित महिलेचे नाव आहे. मयुरी हिचा चार महिन्यांपूर्वी गौरव ठोसर याच्याशी मोठ्या थाटात लग्न झालं होतं. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांत हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मयुरीचा छळ सुरु केला. यातून तीन वेळा तडजोडही करण्यात आली होती. मात्र, तरी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरूच असल्याने तिने १० सप्टेंबरला सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

वाढदिवसासाठी माहेरून दिले पैसे

मयुरी हिचा 9 सप्टेंबरला वाढदिवस साजरा करण्यात आला, यासाठी माहेरुन पैसे देण्यात आले होते, अशी माहिती तिच्या भावाने दिली. तसेच मयुरीचा मोठा दीर गणेश ठोसर याचा घटस्फोट झालेला असून, तो मयुरीसोबत अश्लील वर्तन करत होता. याबाबत मयुरीने मला सांगितले, मात्र ती मस्करी करत असेल असं वाटलं. मात्र, त्याची वर्तणूक विचित्र असल्याचा आरोपही तिच्या भावाने केला आहे.

पोलिसांनी नाकारला तक्रार अर्ज

या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला. मात्र, पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज घेतला नाही, असा आरोप करत, याप्रकरणी तिचा मोठा दीर गणेश ठोसर, पती गौरव ठोसर, सासू लता ठोसर, किशोर ठोसर , ननंद या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही मयुरीच्या नातेवाईकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---