---Advertisement---

दारूच्या नशेत आला अन् रखवालदारास केली मारहाण, मध्यस्थ दोघांवरही चाकूहल्ला

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : भुसावळ शहरातील नहाटा चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील झाडांच्या कुंड्यांची रखवाली करणाऱ्या वॉचमनवर दारूच्या नशेत आलेल्या इसमाने विनाकारण मारहाण करून त्याच्याकडील ८०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले, तसेच मध्यस्थी करणाऱ्या दोन तरुणांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, वॉचमन राजू पंडित ठाकूर (वय ६०, रा. दीनदयाल नगर, भुसावळ) हे महामार्गावर लावलेल्या झाडांच्या कुंड्यांची निगा राखण्याचे काम करत होते. त्यावेळी गौरव पाटील नावाचा इसम दारूच्या नशेत आला आणि कुंड्यांची तोडफोड करू लागला. त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने वॉचमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या खिशातील ८०० रुपये काढून घेतले.

मारहाणीदरम्यान भूषण कोळी व सुमित झांबरे हे दोघे मदतीस धावले असता, आरोपी गौरव पाटील यांनी त्यांच्यातर चाकने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भूषणच्या उजव्या हाताच्या पंजाला चाकू लागून गंभीर जखम झाली, तर सुमित झांबरेच्या पोटावर चाकूने खोलवर वार झाला. जखमींना तत्काळ ट्रॉमा केअर हॉस्पिटल, भुसावळ येथे नेण्यात आले. मात्र, सुमितच्या गंभीर जखमेवर त्वरित उपचार करता यावे म्हणून त्याला पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे.

या घटनेनंतर आरोपी गौरव पाटील गर्दी पाहून घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजू सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment