NIA ची मोठी कारवाई ; महाराष्ट्रात 15 खतरनाक दहशतवादी ताब्यात?

मुंबई । राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी छापे टाकले आहे. आज (शनिवार) एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासून कारवाई करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली. यात १५ खतरनाक दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या माध्यमातून देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. ISIS ही जगातील सर्वात भयानक दहशतवादी संघटना म्हणून गणली जाते.

इसिसच्या दहशतवादी कट हाणून पाडण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रात आज सकाळपासून एनआयएने एकूण ४४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे.

या छापेमारीत पंधरा खतरनाक दहशतवाद्यांना NIA आणि ATS ने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दहशतवाद्यांजवळ द्रव्य स्वरूपात बॉम्ब स्फोट करणारे साहित्य मिळाले.