नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एनआयसीएलने ५०० जागांसाठी भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. विशेष म्हणजेच पदवी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेला २४ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.
पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III)
भरतीसाठी पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा त्या उमेदवाराला येणे गरजेचे आहे.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/ExSM: ₹100/-]
पगार : रुपये 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा