नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले हे लगेच स्पष्ट झाले नाही.