नासाकडून भारतात पोहोचला ‘निसार’ उपग्रह

तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने ‘निसार सॅटेलाईट’ इस्रोकडे सोपवला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हा निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एयर फोर्सचे सी – १७ विमान बंगरूळमध्ये उतरले. या विमानातून सिंथेटिक अपचर रडार भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्रोकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

भारत- अमेरिका संबंधामध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा यांच्याकडून सयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. २०२४ मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने ‘ निसार’ हा सॅटेलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे. या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्वाची भूमिका बजावणार आहे.

२०२४ मध्ये लाँच होईल निसार सॅटेलाईट
नासाने निसार उपग्रहाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून हा उपग्रह पुढील काम आणि लौंचिंगसाठी इस्रोकडे पाठवण्यात आला आहे. आता इस्रो यावर काम करेल, त्यानंतर २०२४ मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, निसार उपग्रह बंगरुळ येथे दाखल झाला.

नैसर्गिक आपतींची मिळणार आगाऊ माहिती
निसार उपग्रह हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल. याचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भुसखलन प्रवण क्षेत्र शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल. सर्वकाही सुरळीत पार पडले तर, निसार उपग्रह २०२४ मध्ये आंधरप्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल. हा उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह १२ दिवसात संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.