नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात झाली. पीएम मोदींनी नवीन लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांना संबोधित केले. आज महिला आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे.
त्यात चर्चेदरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे संसदेत म्हणाले, ‘काँग्रेसला महिला आरक्षणाचे विधियेक आणल्याने वेदना होत आहेत. पंतप्रधान मोदींनी देशभरात शौचालये बांधून महिलांचा सन्मान केला. हा देश राज्यघटनेने चालतो. आता हे विधेयक लवकरात लवकर लागू करावे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
राज्यसभेत आरक्षण मिळणार नाही, असे घटनेत म्हटले आहे, मग आरक्षण कसे देणार. त्यामुळे महिला आरक्षणाचं काँग्रेसने लॉलिपॉप केलं, अशी टीका ही निशिकांत दुबेंनी केली. दरम्यान काँग्रेसच्या सोनिया गांधीने हे विधेयक आणणे राजीव गांधींचे स्वप्न होते, असे विधान करत. विधेयकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावर बोलताना निशिकांत दुबे म्हणाले, ” काँग्रेसने हे विधेयक वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले. हे विधेयक काँग्रेसचे नाही तर भाजप आणि पंतप्रधानांचे आहे. त्यामुळे फुटबॉलमध्ये जो गोल करतो त्याला श्रेय मिळते त्याच पद्धतीने ह्या विधेयकाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र यांचे आहे.